संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील हरसऩवाडी ते काजळे रस्त्याच्या २०० मीटर अंतराच्या सी सी रोडासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यानी साडे दहा लाखाचा निधी मंदिर करून सोमवारी दि.२२ डिसेबर रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कुदळ मारून केला.
यावेळी कार्यक्रमाला खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, हरसनवाडी चर्चचे फादर श्री लोबो,अँड.चेतन मणेरीकर,ए बी मुरगोड,
भरमाणी पाटील, ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी गावडे,सदस्य श्री बाळण्णावर, विनोद कदम ,श्री कांबळे , पावलू फर्नाडिस,ओमाण्णा पाटील, पी डी .ओ.श्री मोकाशी व गावचे नागरिक उपस्थित होते.
या वेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना चेअरमन विनायक मुतगेकर यानी पूजन केले.व उपस्थिताचे स्वागत केले.
