#खानापूर कोर्टला १४२वर्षे पूर्ण!तेव्हा येत्या एप्रिल,मे मध्ये सिल्वर जुबली कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चिकोडी येथील नूतन कोर्टच्या इमारतीच्या उदघाटन प्रसंगी सुप्रीम कोर्टचे जज्ज प्रसन्नाजी वराळे उपस्थित होते.या निमित्त
खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्षअँड. ईश्वर घाडी तसेच खानापूर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अँड.एच एन देसाई यांनी आपल्या वकील संघटनेच्या शिष्टमंडळानी रविवारी दि.२१ रोजी चिकोडी येथे भेट घेऊन सुप्रीन कोर्टचे जज्ज प्रसन्नाजी वराळे याना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी बोलताना खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी म्हणाले की,खानापूरला कोर्ट होऊन 142 वर्ष पूर्ण होत आहेत.त्यानिमित्त 2026 मध्ये एप्रिल किंवा मे मध्ये कोर्टाची सिल्वर जुबली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाचे जज्ज प्रसन्नजी वराळे याना आमंत्रण देऊन त्यांना खानापूरला येण्याची विनंती केली . व आपल्या वकील संघटनेच्या कार्यकर्त्यांना वकिलांना त्यांची भेट घडवून देऊन खानापूरच्या कोर्टाच्या व तालुक्याच्या अडीअडचणी बद्दल चर्चा करून त्यांना पुढील कार्यक्रमासाठी येण्याचे विनंती वकील संघटनेमार्फत करण्यात आली. तसेच खानापूर वकील संघटना व संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यानी वकिलाच्यावतीने तालुक्यातील जनतेच्यावतीने अभिनंदन केले.
