#५वर्षा खालील सर्व मुलांना लसीचे दोन थेंब!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील केंचापूर गल्ली व विद्यानगरात राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत रविवारी दि.२१ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला बालकांचा उदंड प्रतिसाद लाभला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायती च्या नगराध्यक्षा सौ.मिनीक्षी बैलुरकर, उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला नगरसेवक प्रकाश बैलुरकर, तालुका आरोग्य अधिकार डॉ.महेश किवडसन्नावर अंगणवाडी शिक्षिका,अशा कार्यकर्त्या, डाँक्टर, नर्स व सरकारी हाॅस्पिटलचे कर्मचारी,तसेच नागरिक ,बालक,माता उपस्थित होत्या.
उदघाटन प्रसंगी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश किवडसन्नावर म्हणाले की,खानापूर तालुक्यात एकूण १६हजार ५०८ बालकाना लसीकरणाचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे.
या सा ठी १३५ लसीकरण केद्रे उघडण्यात आली आहे.तसेच लसीकरणासाठी २८३ पथके कार्यरत आहेत.
या वेळी ऊसतोड कामगाराच्या बालकाना , वीटभट्टी कामगारांच्या बाल कां ना, तसेच बांध काम क्षेत्रातील कामगारांच्या बालकाना पोलिओपासुन संरक्षण मिळावे.यासाठी विशेष दक्षता घेऊन लसीकरण करण्यात येईल . तेव्हा नागरीकाना याचा लाभ घ्यावा.असे आवाहन केले.
या वेळी नगराध्यक्षा सौ. मिनाक्षी बैलुरकर यानी बालकाला पोलिओ डोस पाजुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

