#५वर्षा खालील सर्व मुलांना लसीचे दोन थेंब!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील सरकारी हाॅस्पिटलमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत रविवारी दि.२१ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकार डॉ.महेश किवडसन्नावर होते.
कार्यक्रमाला नगरपंचायतीचे अधिकारी प्रेमानंद नाईक, व सरकारी हाॅस्पिटलचे कर्मचारी,तसेच नागरिक ,बालक,माता उपस्थित होत्या.
य़ावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश किवडसन्नावर म्हणाले की,खानापूर तालुक्यात एकूण १६हजार ५०८ बालकाना लसीकरणाचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे.
या सा ठी १३५ लसीकरण केद्रे उघडण्यात आली आहे.तसेच लसीकरणासाठी २८३ पथके कार्यरत आहेत.
या वेळी ऊसतोड कामगाराच्या बालकाना , वीटभट्टी कामगारांच्या बाल कां ना, तसेच बांध काम क्षेत्रातील कामगारांच्या बालकाना पोलिओपासुन संरक्षण मिळावे.यासाठी विशेष दक्षता घेऊन लसीकरण करण्यात येईल . तेव्हा नागरीकाना याचा लाभ घ्यावा.असे आवाहन केले.
प्रारंभी डाॅ.शिवानंद किनगी प्रास्ताविक केले.
तर तालुका अधिकारी डॉ महेश किवडसन्नावर यानी बालकाला डोस पाजुन पोलीओ लसीकरणाचा शुभारंभ केला. यावेळी नगर पंचायतीचे अधिकारी प्रेमानंद नाईक यानी बालकाना डोस पाजला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ शिवानंद किनगी यानी मानले.
