संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) गावातून डिसेंबर महिन्यात चार अग्निवीर थलं सेनेमध्ये भरती झाले. यामध्ये कुमार हर्ष गुंजिकर, कुमार अभय गुरव , कुमार कुशल तिरवीर, कुमार मारुती तिरवीर याचा समावेश आहे.
यानिमित्त सर्व अग्निवीर सैनिकांचे, सैनिक कल्याण सेवा संघ तोपिनकट्टी( ता., खानापूर ) यांच्यावतीने शाल , पुष्पहार घालुन त्यांचे अभिनंदन केले . व त्याना हार्दिक शुभेच्छा आणि पुढील प्रशिक्षणाला उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.
या चारी ही अग्निवीराचे तोपिनकट्टी सह तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.


