#दोन दिवस चालणार यात्रा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
झाडअंकले ( ता.खानापूर ) गावचे ग्राम दैवत भुतनाथ देवाची यात्रा मंगळवारी दि. १६ व बुधवारी दि.१७ डिसेंबर असे दोन दिवस साजरी होत आहे.
खानापूर बेळगाव महामार्गावरील झाड अंकले जवळील भुतनाथ डोगरावरील भुतनाथ देवाची यात्रा साला बाद प्र माने यंदा ही होत आहे.
मंगळवारी पहाटे सहा वाजता भुतनाथ डोगरावर महापूजा होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता इंगळ्याचा कार्यक्रम होणार आहे. तर दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत भुतनाथ डोंगरावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रे निमित्त बुधवारी दि.१७ रोजी रात्री १० वाजता कोल्हापुर येथील सारेगामा आर्केस्ट्रा यांचा सगळी नाती स्वार्थासाठी हा नाट्यप्रयोग होणार आहे.तरी भाविकानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन झाडअंकले ग्रामस्थ व भुतनाथ यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

