
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सीमा भागातील ८६५ खेड्यांमधील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून मिळणाऱ्या सवलतींचा सारांश डॉ श्रीपाल गायकवाड डॉ नवनाथ वलेकर डॉ कविता वड्राळे यांच्याकडून सीमा भागातील ८६५ खेड्यांमधील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून मिळणाऱ्या सर्व सवलतीचा सारांश छत्रपती शिवस्मारक खानापूर येथे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई अध्यक्ष महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर ,गोपाळ पाटील सदस्य मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, मुरलीधर पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर चिटणीस आबासाहेब दळवी व समारंभासाठी माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत खजिनदार संजीव पाटील ,निवृत्त शिक्षक श्री हेब्बाळकर , अर्बन को-ऑपरेटिव बँक खानापूरचे अध्यक्ष अमृत शेलार , राजाराम देसाई ,पुंडलिक पाटील, अजित पाटील ,अँड. केशव कळेकर अनेक विद्यार्थी पालक कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणजीत पाटील सहचिटणीस महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांनी केले