, # नंदगड भागातील शेतकर्याची वनखात्याकडे मागणी!
. संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात हत्तीनी घातलेला धुमाकूळ अद्याप संपता संपेना ,त्यामुळे शॆतकरी वैतागले आहेत.वैतागुन वनखात्याकडे विनवणी करताना म्हणत आहे की , वनखात्याने शेतकर्यीच्या पोटावर मारू नये . हवेतर पाठीवर मारावे .,अशी मागणी करत असतानाच नुकताच खानापूर तालुक्यातील नंदगड गावच्या शिवारात चार पाच हत्तीनी कळपाने भात शिवाराचे, उसाचे तसेच नारळांचे प्रचंड नुकसान केले.
नंदगड परिसरातील गवळीवाड्यातील शेतात हत्तीच्या कळपाने मारुती मणेरीकर यांच्या नारळ ,केळीच्या झाडांचे, सुनील कारलगेकर व इतर शेतकर्याच्या भात पिकांचे तसेच राजू गावकर यांच्या उस पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे.
गेल्या काही दिवसापासुन खानापूर तालुक्यातील नागरगाळी,तावरकट्टी,बाळगुंद ,मास्केनट्टी,
हत्तरवाड, लोंढा, कुंजी सावरगाळी, संगरगाळी भागात अनेक पिकांचे नुकसान केले आहे.
तर नंदगड तसेच झाडनावगे शिवारात पाच ते सहा हत्तीनी रात्री व भरदिवस पिकात घुसून पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे.त्यामुळे वनखात्याने शेतकर्याच्या पोटावर न मारता हवेतर त्याच्या पाठीवर मारा.आणि हत्तीचा बंदोबस्त करा. अशी मागणी शेतकर्यातुन होत आहे.

