संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील रेल्वेस्टेशन रोड वरील आशीर्वाद हाॅस्पिटल सुरू होऊन तीन वर्षा या काळ संपला. याचे औचित्य साधुन आशीर्वाद हाॅस्पिटल,तसेच श्री आर्थॊ आणि ट्राॅमा सेंटर याच्यावतीने खानापूर शहरासह तालुक्यातील डाॅक्टर वर्गासाठी एक दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.डी.ई.नाडगौडा उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली.प्रास्ताविक. व उपस्थितांचे स्वागत डाॅ.राम पाटील यानी केले.
आशिर्वाद हाॅस्पिटलमध्ये सोनोग्राफी, मानसोपचार, त्वचा रोग,दमा तसेच छाती विकार, स्पाईन, हाडाचे रोग व इतर विविध स्पेशालिस्ट तज्ञांकडुन सेवा उपलब्ध आहे.तसेच डॉ.विनोद माळी(एम डी मेडिसीन ) यांच्याकडुन २४x७ मेडिसिन सेवा रूग्णांना उपलब्ध केली जाते. तेव्हा तालुक्यातील अधिकाधिक रूग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.यासाठी तालुक्यातील डाॅक्टर एकत्र येऊन टीम वर्क करत असल्याचे कौतुक खानापूर डाक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.डी.ई.नाडगौडा यानी कार्यशाळेतील अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
या वेळी कार्यक्रमात बोलताना बेळगाव येथील डॉ. देवेगौडा यानी खानापूर डाॅक्टरटीमचे कौतुक करत ,रूग्णांना अधिकाधिक वेळ देऊन रूग्णसेवा परिणाम कारक करा.असा संदेश दिला.
या वेळी डॉ.शंकर पाटील, डॉ.एन एल कदम,डॉ.सुनील पाटील आदीनी मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळा कार्यक्रमाला खानापूर शहर सह रामनगर,जांबोटी,नंदगड,हलसी, आदी गावचे सुमारे ५०डाॅक्टर उपस्थित होते.
तर कार्यशाळा कार्यक्रमात डॉ.सागर चिट्टी,डॉ.पी.एन.पाटील,डॉ.पी.बी.चिट्टी,डॉ.श्रीकांत घाडी,डॉ. वैभव भालकेकर,डॉ.वैभव पाटील,डॉ.नंद्याळकर. आदीचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.रामा पाटील यानी केले.तर आभार डॉ.मदन कुंभार यानी मानले.
