खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता. खानापूर) गावचे सुपुत्र व खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी सेक्रेटरी व भाजप युवा नेते गजानन उर्फ विशाल गावडू पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात मोठ्या उत्साहात पार पडला.
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप नेते राजेंद्र रायका, युवा नेते पंडित ओगले ,प्रकाश निलजकर, माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, सदानंद होसुरकर, सुनील मासेकर, राजू जांबोटकर, बबन आल्लोळकर आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खानापूर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल म्हणाले की, गजानन पाटील यांची जन्मभूमी
मंणतुर्गा (ता. खानापूर) असून शेतकरी कुटुंबात जन्मलेले गजानन पाटील हे लहानपणापासूनच समाजकार्यामध्ये वाहून घेऊन कार्य करणारे भारतीय जनता पार्टीचे माजी सेक्रेटरी व भाजप युवा नेते अशी त्यांची ओळख आहे.
गावात विकास व्हावा. यासाठी सतत धडपडणारे युवा नेते गजानन पाटील यांनी पीकेपीएस संस्था स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
गावच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा नेहमी पुढाकार असतो. शाळा इमारतीसाठी नेहमी धडपडत असतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सेवा व्हावी ही त्यांची सतत धडपड असते. गावचा शैक्षणिक दर्जा नेहमी चांगला राहावा.ही त्यांची इच्छा असते.
गेल्या कित्येक वर्षापासून ते माझ्या सहवासात भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. भाची पक्षाच्या प्रगतीसाठी सतत धडपडत असतात. कार्यतत्पुरता व प्रमाणपणा यामुळे ते सर्वांना प्रिय आहेत. असे मत व्यक्त केले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की गजानन पाटील हे समाजकार्यासाठी तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल तसेच भाजप पक्षाच्या प्रगतीसाठीची धडपड खूप मोठी आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून गजानन पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा! असे मत व्यक्त केले.
यावेळी खानापूर तालुक्यातील भाजपच्या नेत्यांनी तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप युवा नेते गजानन पाटील यांचा शाल, पुष्पहार व पेढे भरून वाढदिवस साजरा केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना भाजप युवा नेते गजानन पाटील म्हणाले की, खानापूर तालुक्यातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन व युवा कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे मी भाजप पक्षासाठी कार्य करू शकलो. असेच मार्गदर्शन व सहकार्य यापुढे मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली.