संदेश कांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता. खानापूर) गावचे सुपुत्र व खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी सेक्रेटरी व भाजप युवा नेते गजानन उर्फ विशाल गावडू पाटील यांच्या आज शुक्रवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
गजानन उर्फ विशाल गावडु पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा परिचय:
मंणतुर्गा (ता. खानापूर) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले गजानन लहानपणापासूनच समाजकार्यामध्ये वाहून घेऊन कार्य करणारे भारतीय जनता पार्टीचे माजी सेक्रेटरी व भाजप युवा नेते अशी त्यांची ओळख आहे.
गावात विकास व्हावा. यासाठी सतत धडपडणारे युवा नेते गजानन पाटील यांनी पीकेपीएस संस्था स्थापन करण्यास मोठा पुढाकार घेऊन यशस्वी संस्था कार्यरत आहे.
गावच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा नेहमी पुढाकार असतो. शाळा इमारतीसाठी नेहमी धडपडत असतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सेवा व्हावी ही त्यांची सतत धडपड असते. गावचा शैक्षणिक दर्जा नेहमी चांगला राहावा ही त्यांची इच्छा असते.
यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर, खानापूर तालुका माजी भाजपाध्यक्ष संजय कुबल व इतर भाजप नेते यांच्या मार्गदर्शनाखाली ते नेहमी समाजकार्यासाठी तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल तसेच भाजप पक्षाच्या प्रगतीसाठीची धडपड त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून गजानन पाटील यांच्याकडे पाहिले जाते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा!