“शिंदोळी ( ता. खानापूर) येथील आदर्श माता कै. सौ. भागीरथी यशवंत पाटील यांचे दि. 15 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. आज त्यांचा अकरावा दिवस त्यानिमित त्यांचा थोडक्यात परिचय……
शिंदोळी तालुका खानापूर येथील प्राथमिक शिक्षक श्री.वाय.एन.पाटील यांच्या पत्नी म्हणून कै.सौ. भागीरथी पाटील यांच्याकडे पाहिले जाते.
लग्न झाल्या पासून त्यांनी प्राथमिक शिक्षक श्री वाय.एन. पाटील यांचा संसार फुलविला. पतीच्या सोबत राहून आपल्या संसारात दोन सुपुत्र व एक कन्या यांना लहानाचं मोठं करून सुशिक्षित केले.
त्यांचा मोठा मुलगा राजेश पाटील हे शिंदोळी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आहेत. याशिवाय हे समाज कार्य करतात. दुसरा मुलगा पांडुरंग पाटील हा शेती व्यवसाय करतो.
त्यांची एकुलती एक मुलगी सौ. माया मोहन पाटील कंग्राळी खुर्द याचे पती श्री.एम आर पाटील हे ऑलम्पिक रेसलर व निवृत्त एअरफोर्स त्यांच्याशी सुखाचा संसार करते. त्यांची नातवंडे ही सुद्धा उच्च शिक्षित आहेत.
कै.सौ. भागीरथी पाटील यांनी गेली 60 वर्षे आमच्या कुटुंबाचे पालनपोषण करून आम्हा सर्वांना आनंदी ठेवले.
आज आम्हा सर्वांना सोडून ही माता देवा घरी गेली. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. ही ईश्वर चरणी प्रार्थना!
तुझा मुलगा
राजेश पाटील.माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, विद्यमान सदस्य शिंदोळी.