संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुकाच्या नूतन तहसीलदार मंजुळा के. नायक यांचे खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने स्वागत समारंभ सोमवार दिनांक 17 रोजी तहसील कार्यालयात करण्यात आला.
खानापूर तालुक्याचे तहसीलदार दुंडप्पा कोमार यांची बदली करण्यात आली. असून त्यांच्या जागी खानापूर तालुक्याच्या नूतन तहसीलदार पदी सौ. मंजुळा के. नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सौ . मंजुळा के. नायक यांनी
शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.या निमित्त सोमवारी दिनांक 17 रोजी तहसील कार्यालयात स्वागत समारंभ पार पडला.
यावेळी खानापूर तालुका भाजप पक्षाचे माजी अध्यक्ष संजय कुबल यांनी बोलताना म्हणाले की खानापूर तालुका हा शांतता प्रिय तालुका आहे. तालुक्यात 80 टक्के मराठी भाषिक आहेत. त्यामुळे खेड्यातील नागरिक हे कामानिमित्त तहसील कार्यालयात येत असतात. त्यांना कन्नड भाषेचे ज्ञान नसते. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडून सहकार्य करावे. तालुक्याचा विकास साधावा.अशी मागणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय कुबल यांनी केली.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सदैव तुम्हाला सहकार्य करू. तालुकाच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तालुक्याचा विकास साधू. तालुक्याच्या प्रत्येक नागरिकांची समस्या तुम्ही सोडून त्यांना न्याय द्या. असे सांगितले.
यावेळी नूतन तहसीलदार सौ. मंजुळा के नायक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
स्वागता वेळी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर तालुका भाजप माजी अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते राजेंद्र रायका, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप युवा नेते पंडित ओगले, प्रकाश निलजकर, बाळू सावंत, भूषण ठोंबरे आदी भाजप नेते उपस्थित होते.
यावेळी नूतन तहसीलदार सौ. मंजुळा के. नायक यांनी सर्वांचे आभार मानले.