“ऊस ट्रकांची वाहतूक वाढली “
नेरसा, बिडी,जांबोटी भागातून उसाची वाहतूक मोठी!
संदेश क्रांति न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
अलीकडे ऊस लागवड खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याच्या उसाकडे तालुक्याच्या बाहेरील साखर कारखान्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील उसाची वाहतूक तालुक्याच्या बाहेर जोरात चालू आहे.
नेरसा, बिडी, जाबोटी परिसरात ऊस वाहतुकीला जोर!
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी तसेच नेरसा,बिडी परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. हा भाग जंगलाने व्यापलेला आहे. जंगली प्राण्यांपासून सुटका करून घेण्यासाठी या भागातून उसाची उचल लवकर होत आहे.त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शिवारातील उसाची उचल तालुक्याच्या बाहेरील साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.
खानापूर तालुक्याबाहेरील साखर कारखान्यांना ऊसाची वाहतूक!
खानापूर तालुक्याबाहेरील अनेक साखर कारखान्यांनी सध्या उसाची उचल मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यामध्ये बेळगाव शुगर, बल्लद बागेवाडी शुगर ,बैलहोंगल शुगर, निपाणी शुगर, नलवडे शुगर, संकेश्वर शुगर, नलावडे शुगर, (यूकेकेन) आधी अनेक तालुक्यातील अनेक साखर कारखान्यानी खानापूर तालुक्यातील उसाची उचल करताना ऊस वाहतूक ट्रकांचे दर्शन होत आहे.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील उसाची उचल लवकर होऊन शेतकऱ्यांना लवकर दिलासा मिळणार आहे. व शेतकरी उसाच्या व्यापातून लवकर मुक्त होणार आहेत.
तालुक्याच्या नेरसा, बिडी, नागुर्डा, मोदेकोप,जांबोटी, काटगाळी, कक्केरी, बिडी, बेकवाड सह तालुक्याच्या विविध गावच्या शिवारातून उसाची वाहतूक तालुका बाहेरील साखर कारखान्याला होत आहे.
