“संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचे तहसीलदार दुंडप्पा कोमार यांची बदली करण्यात आली असून. खानापूर तालुक्याच्या तहसीलदार पदी सौ. मंजुळा के. नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सौ . मंजुळा के. नायक यांनी
शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
या निमित्त खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ मीनाक्षी बैलूरकर आणि त्यांचे पती नगरसेवक प्रकाश बेलूरकर यांनी शनिवारी नूतन तहसीलदार सौ. मंजुळा के नायक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
