संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
आरएसएस खानापूर शाखेतर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही खानापूर शहरातील शाहू नगरात दीपोत्सव, भारतमाता पूजन आधी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
प्रारंभी श्री रासाई माऊली मंदिरात दीपक चव्हाण कार्यक्रमाची सुरुवात झाली . यावेळी भारत माता पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला बेळगाव विभाग प्रचारक श्री सतीश कुमार यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले हिंदू समाजातील सर्व घटकांमध्ये उत्तम संस्कार देशभक्ती आणि सामाजिक समरसता दूर होऊन आपला देश समुद्र बलशाली व विश्वगुरू स्थानावर विराजमान होईल यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे विचार व्यक्त केले.
श्री रासाई माऊली मंदिरात आरती पार पडली. यावेळी समजकांनी आणलेला फराळ एकत्र करून सर्वांनी त्याचा स्वाद घेतला.
कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा सहकार्यवाह बिट्टप्पा नाईक, तालुका सहकार्यवाह विजय होळणकर, दिलीप सोनटक्के, नगरसेवक लक्ष्मण मादर, तसेच शाहू नगरातील युवक बालक महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह सर्वज्ञ कपिलेश्वरी यांनी केले. यावेळी आभार दिलीप सोनटक्के यांनी मानले.
