# खानापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
महिलांनी केवळ चूल आणि मूल एवढेच न करता श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजनातून आपली प्रगती साधावी. जेणेकरून आपल्या संसाराला त्याचा लाभ होईल. संसार चालवताना या योजनेमुळे हातभार लागेल. व आपल्या संसार सुखाचा होईल. यासाठी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजनेचा लाभ घ्यावा.
असे आवाहन करून काँग्रेसच्या पाच गॅरंटी योजनाचा लाभ महिलांना कसा होत आहे याबद्दल सविस्तर माहिती खानापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी शनिवार दि.8 रोजी माचिगड (ता. खानापूर ) येथील प्रगती बंधू स्व सहाय्य संघ नंदगड विभाग माचिगड यांच्यावतीने आयोजित परमपूज्य राजश्री डॉक्टर वीरेंद्र हेगडे व मातोश्री श्री डॉक्टर हेमावत हेगडे यांच्या कृपा आशीर्वादाने धार्मिक सभा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी के पी एस संघाचे चेअरमन बाबुराव पाटील होते. उद्घाटक म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर होते. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील, प्रमोद कोचेरी , बेळगाव जिल्हा निर्देशक सतीश नाईक, पत्रकार वासुदेव चौगुले, नारायण मोरे तसेच प्रमुख वक्ते म्हणून भाजप नेते संजय कुबल उपस्थित होते.
प्रास्ताविक क्षेत्र योजना अधिकारी गणपती नायक यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, प्रमोद कोचेरी आदींनी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजनेतून खेड्यातील महिलांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शेवटी प्रमुख वक्ते भाजप नेते संजय कुबल बोलताना म्हणाले की, श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी या योजनेतून अनेक गरीब महिलांना तसेच कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. या योजनेअंतर्गत विविध छोटे-मोठे उद्योग मिळाल्याने कुटुंब चालवण्यास खूप मोठी मदत झाली आहे. या श्री क्षेत्र धर्मस्थळ च्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अनेकांच्या समस्या, वाईट सवयी, लोकांच्या पासून दूर नेल्या. त्यामुळे अनेकांचे संसार चांगले चालले. श्रीक्षेत्र धर्मस्थळ संस्था ही गरीब व महिलांच्यासाठी एक आधारच आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी क्षेत्र योजना अधिकारी खानापूर गणपती नायक म्हणाले की कर्नाटक राज्यात श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी एकूण संघ सहा लाख 50 हजार इतके आहेत.यामध्ये 55 लाख सदस्य आहेत. बेळगाव धर्मस्थळ व महाराष्ट्र बँकेच्या वतीने कर्जाचे नियोजन केले जाते.
अशी माहिती दिली. तर बेळगाव जिल्हा निर्देशक सतीश नाईक यांनी श्री क्षेत्र धर्मस्थळ अभिवृत्ति संघ याबद्दल अधिक माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.पी गिरी यांनी केले.

