“खानापूर हेम्माडगा रस्त्याच्या हल्लात्री नदी पुलाजवळ खड्ड्याचे साम्राज्य”
ऊस वाहतूकीला होणार अडथळा!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर हेम्माडगा रस्त्यावरील हल्लात्री नदी पुलाजवळ खड्ड्याचे साम्राज पसरले आहे. त्यामुळे खानापूर हेम्माडगा रस्त्यावरील वाहतुकीला खूपच अडथळा निर्माण झाला आहे. नदी पुलापासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर जागोजागी मोठमोठे खड्डे पसरले आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक ला धोका निर्माण झाला आहे.
रेल्वे ब्रिज बांधकामावेळी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे!
खानापूर हेम्माडगा रस्त्यावरील रेल्वे ब्रिज बांधकामावेळी संबंधित कंत्राटदराच्या हलगर्जपणामुळे व रस्त्यावर अवजड वाहतुकीने रस्ता खराब होऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित रस्त्यावरचे खड्डे व रस्ता दुरुस्ती करण्याचे काम कंत्राटदाराने करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले त्यामुळे आज या रस्त्यावर खड्ड्यांचे सम्राज पसरलेआहे.
ऊस वाहतुक वाहनांना खड्ड्यांशी करावा लागणार सामना!
खानापूर हेम्माडगा या रस्त्यावरून दरवर्षी ऊस वाहतुकीची मोठ्या प्रमाणात ये जा सुरू असते. या भागातील ऊस वाहतूक याच रस्त्यावरून केली जाते. त्यामुळे यंदा या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना खड्ड्यांशी सामना करावा लागणार. खड्डे बुजवले नाही तर ऊस वाहतूक करणे कठीण होणार आहे.
तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी खानापूर हेम्माडगा रस्त्यावरील हल्लात्री नदी पुलाजवळील खड्डे बुजवावे. व ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना येजा करण्यास रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी ऊस उत्पादकातून व शेतकरी, प्रवासी वर्गातून होत आहे.