“एस डी एम सी चे बी ई ओ ना निवेदन”
संदेश क्रांती न्यूज. :
खानापूर प्रतिनिधी
मुघवडे. (ता. खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत मराठी शिक्षकांची कमतरता असून लागली मराठीच्या शिक्षकांची नेमणूक करा. अशा विषयाचे निवेदन मुघवडे प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी कमिटीच्या वतीने बीईओ पी यांच्याकडे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटलं आहे.की मुघवडे शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकच नाहीत. केवळ अतिथी शिक्षकावर व कन्नड शिक्षकावर शाळा चालू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान शैक्षणिक नुकसान होत आहे तेव्हा लागलीच मराठी शिक्षकांची नेमणूक करावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे असे अशी मागणी निवेदनारी केली.
यावेळी बीईओ पी रामाप्पा यांनी निवेदनाचा स्विकार करून लवकरात लवकर नवीन शिक्षकांची नेमणूक करण्यात येईल असे आश्वासन दिले.
निवेदन देताना निलावडे ग्रामपंचायत सदस्य व खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर,एसडीएमसी अध्यक्ष रामा बेटगिरीकर, उपाध्यक्ष भागीरथी मादार, सदस्या संतोषी होशीलकर, प्रियांका होशीलकर, शोभा गवाळकर, अनिल बरगावकर, मोहन गवाळकर, विजय चिखलकर ,प्रकाश बेटगीरकर, विश्वनाथ बेटगिरकर, राहुल राणे, सहदेव महाडिक आधी मान्यवर उपस्थित होते.

