“मुघवडेत विद्युत खांब, विधुतताराची सोय करा.”
तालुका काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली हेस्कॉम खात्यात केली सूचना! निवेदन सादर!
संदेश कांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मुघवडे ( ता. खानापूर) गावात काही ठिकाणी विद्युत खांब मोडून पडले आहेत. तर काही ठिकाणी विद्युत तारा जमिनीवर पडलेल्या आहेत. परिणामी गावात वीज पुरवठा सुरळीत होत नाही तेव्हा हेस्कॉम खात्याने कायमस्वरूपी तोडगा काढून मुघवडे गावची समस्या सोडवावी. अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर हेस्कॉम खात्याचे अभियंते जगदीश मोहिते यांना देण्यात आले.
निवेदन देताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी म्हणाले की, मुघवडे गावात विद्युत खांब मोडून पडले आहेत.तर काही ठिकाणी विद्युत तारा जमिनीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे गावच्या नागरिकांना याचा धोका संभवतो. जमिनीवर पडलेल्या विद्युतरामुळे नागरिकांना भीती निर्माण होते. शाळकरी मुले ये जा करतात त्यांना याचा धोका संभवतो.तेव्हा मुघवडे गावात नव्याने विद्युत खांब उभारून तसेच नव्याने विद्युत तारा घालून नागरिकांची सोय करावी अशी सूचना केली.
यावेळी हेकॉम खात्याचे अभियंते जगदीश मोहिते यांनी समस्या ऐकून घेऊन लागलीच समस्या दूर करू असे आश्वासन दिले.
निवेदन देताना निलावडे ग्रामपंचायत सदस्य व खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, काँग्रेस शहराध्यक्ष महांतेश राऊत, राजेश पाटील,एसडीएमसीचे अध्यक्ष रामा बेटगीरकर, उपाध्यक्ष भागीरथी मादर, मोहन गावकर ,विजय चिखलकर मारुती चोलेकर, राहुल राणे, अनिल बेटगीरकर, संजीव होशीलकर ,प्रकाश बेटगीरकर, सहदेव महाडिक तसेच सदस्या प्रियांका होशीलकर , संतोषी होशीलकर शोभा गवाळकर आधी गावचे नागरिक उपस्थित होते.

