संदेश क्रांती न्यूज
पत्रकार परिषदेत माहिती
खानापूर प्रतिनिधी
सेवा वरील जीएसटी दरामधील बदल सोमवार दि 22 सप्टेंबर पासून लागू होत आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय जनतेला दिलासा मिळाला आहे. अशी माहिती रविवारी 21 रोजी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधमात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या वतीने देण्यात आले.
पत्रकार परिषदेच्याअध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर होते. यावेळी खानापूर तालुका भाजप सेक्रेटरी मल्लाप्पा मारीहाळ यांनी प्रास्ताविक करून उपस्थित स्वागत केले.
तर भाजप नेते एडवोकेट चेतन मणेरीकर यांनी जीएसटी च्या कपाती बद्दल सविस्तर माहिती दिली.
या बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, 33 जीवन रक्षक औषधावरील जीएसटी 12 टक्क्यावरून शून्य टक्के वर करण्यात आले आहे. कर्करोग आणि दुर्मिळ आजारासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन गंभीर औषधाकरिता जीएसटी पाच टक्के वरून शून्य करण्यात आले आहे. ज्यामुळे आरोग्य सेवेची उपलब्धता बळकट झाली आहे.
ट्रॅक्टर, कापणी यंत्र, आणि कंपोस्ट सारख्या यंत्रसामुग्री वरील जीएसटी 12 टक्क्यावरून पाच टक्के पर्यंत कमी करण्यातआली आहे. सेल्फ्युरिक आम्ल नायट्रिक आम्ल आणि अमोनिया सारख्या खतांच्या निविष्ठा वरील जीएसटी 12 वरून पाच टक्के पर्यंत करण्यात आले आहे. हस्तकला सारख्या इतर वस्तू वरील सीएसटी 12 टक्क्यावरून पाच टक्के पर्यंत करण्यात आली आहे. याशिवाय इतर कपडे यंत्र गाड्या आदींच्या जीएसटी मध्ये सवलत देण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष बसू साने को प, माजी तालुकाध्यक्ष संजय कुबल, भाजप युवानेते पंडित ओगले आदींनी जीएसटीच्या सवलती बद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी खानापूर येथील जांबोटी क्रॉस वरील बसवेश्वर पुतळ्याजवळ भाजपच्या वतीने विजयोत्यव साजरा करण्याचे सांगण्यात आले
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष बसू सानिकोप, माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेत्या सौ धनश्री सर देसाई, तालुका भाजप सेक्रेटरी मल्लाप्पा मारिहाळ, बाबुराव देसाई, भाजप युवा नेते पंडित ओगले, एडवोकेट चेतन मनेरिकर, एम.डी. सदानंद पाटील, नगरसेवक आप्पाया कोडोळी, राजू सिद्धांनी, भरमाणी पाटील आधी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.