#दौडीचा दैनंदिन मार्ग!
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता खानापूर) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान गर्लगुंजी विभाग यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही उद्या सोमवार दि. 22 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोंबर पर्यंत दुर्गामाता दौडीला दररोज सुरुवात होणार आहे.(घटस्थापना ते विजयादशमी दसरा पर्यंत)
तरी शिवभक्तांनी रोज पहाटे साडेपाच वाजता दुर्गामाता दौडीच्या प्रारंभीच्या वेळी वेळी उपस्थित राहण्याचे आव्हान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान गर्लगुंजी विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.