संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
इटगीत ( ता. खानापूर) येथील शाळा वाचवण्यासाठी शनिवार दि.२० रोजी आंदोलन चा पवित्रा घेतला. यावेळी
खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजलीताई हेमंत निंबाऴॢकर यांनी इटगी येथे आंदोलनात भाग घेतला होता.
त्या आमदार असताना इटगी येथे सरकारी प्रौढ शाळेसाठी ८ वी चा वर्ग सुरू केला पुढे ९ वी व १० वी असे हायस्कूल चालू होणार होते
परंतु कोणीतरी सरकार दरबारी शिफारस करून ही इटगीची शाळा
गस्टोळी येथे दाखल केली. त्यामुळे इटगी गावच्या मुलांचे नुकसान झाले होते. यासाठी इटगी गावच्या नागरिकांनी शनिवारी बंद पुकारला होता .
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी इटगीला भेट देऊन ग्रामस्थांच्या आंदोलना मधे भाग घेतला, भर पाऊसात आंदोलन कर्त्या मुलांसोबत पावसात भिजत राहिल्या परंतु जागेवरून उठल्या नाहीत.
शेवटी कमिशनर इश्वर उळागड्डी यांचेशी चर्चा करून शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्या शी चर्चा करून इटगी शाळेचा प्रश्न मार्गी लावला.
त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तसेच गस्टोळीची शाळा पण चालू राहू द्या
दोन्ही शाळेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी इटगी गावचे नागरिक, माजी आमदार अरविंद पाटील, कन्नड रक्षक वेदीकेची कार्यकर्ते, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते