” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अध्यक्ष यल्लापा गुरव यांनी स्वखर्चातुन नंदगडात हिंदू रयत स्मशानभुमीत दहिणी शेडची केली उभारणी”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता.खानापूर ) ग्राम पंचायतीचे अध्यक्ष यल्लापा शिवाजी गुरव यांना यंदाच्या १५ आँगष्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते. ते ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा शिवाजी गुरव यानी समाजाच्या हितासाठी व नंदगड गावच्या हिंदू रयत समाजासाठी स्मशान भुमीत स्वत: १ लाख रूपये खर्चून दहिनीचे शेड उभारून तालुक्यात एक नवा उपक्रम दाखवून दिला. त्याच्या उपक्रमामुळे गेल्या कित्येक वर्षानंतर नंदगड गावच्या हिंदु रयत समाजाला स्मशान भुमीत चांगल्या दहिनी शेड उभारून समाजाची सोय करून दिली.
स्मशान भुमीत दहिनी शेड नसल्याने नागरीकांना त्रास होत होता. उन्हाळ्यात ऊन्हाचा त्रास तर पावसाळ्यात पावसाचा त्रास होत होता.याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित कलेले ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा शिवाजी गुरव यानी शेडची उभारणी केल्याबद्दल त्यांच्या उपक्रमाबद्दल नंदगड गावासह खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील ग्राम पंचायत अध्यक्षानी या उपक्रमाची जाणीव ठेवून असे कार्य केले तर गावचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. असेच म्हणावे लागेल.