#आमदारांच्या कडुन पाहणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता.खानापूर ) गावच्या शेतात जंगली प्राण्याकडुन शिवारातील ऊस पिकांचे प्रचंड नासधुस करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यानी आर्थिक नुकसानी ला सामोरे जावे लागते. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर ,आर एफ ओ. श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत ऊस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, नंदगड परिसरातील ज्या शेतकर्याच्या ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. अशा अनेक शेतकर्याना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल .तसेच उर्वरीत नुकसान ग्रस्त शेतकर्याना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन आमदार विठ्ठल हलगेकर यानी शेतकर्याना दिली.
यावेळी आर एफ ओ श्रीकांत पाटील यानी बोलताना सांगीतले ऊस पिकांच्या नुकसान भरपाई साठी वनखात्याकडुन सर्व सहकार्य देण्यात येईल तेव्हा शेतकर्यानी आपली कागद पत्रे वेळत देऊन सहकार्य करावे.असे सांगीतले.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर,खानापूर वनविभागाचे आर एफ ओ. श्रीकांत पाटील शेतकरी प्रशांत लक्केबैलकर,बाळू पाटील, दिलीप गुंडानी,महादेव करविनकोप्प,
यल्लापा गुरव , तुकाराम गौडा तसेच नंदगड परिसरातील शेतकरी उपस्थित होते.