“बलिदानाचे स्मरण करण्यासाठी खानापूरात वनखात्यातर्फे वन शहीद दिन”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
वनखात्यात सेवा करताना वन्य प्राणाच्या हल्ल्यात अथवा गुन्हेगारांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्याच्या सन्मानार्थ दि .११ सप्टेबर रोजी वन शहीद दिन साजरा केला जातो. सन १७३० जोधपुरच्या महाराज्यानी त्याच्या राजवाड्याच्या बांधकामासाठी हजारो झाडे तोडण्यास विरोध करणार्या बिशनोई समाजातील ३६३ लोकाना ठार मारले होते.त्याच दिवसाची आठवण म्हणून देशभर वनखात्याकडुन दि ११ सप्टेंबर हा दिवस शहीद दिन म्हणून घोषित केला आहे.
आज जंगल संरक्षणासाठी मृत्यू मुखी पडलेल्या श्रध्दांजली अर्पण करताना त्यानी जंगलाचा संरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते.अशी माहिती वनाधिकार्यानी दिली.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेएमएफसी न्यायाधिश विरेश हिरेमठ तसेच वरिष्ठदिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश चंद्रशेखर तलवार,एसीएफ सुनिता निंबरगी,निवृत्त अधिकारी मलशेप्पा बेनकट्टी,वन अधिकारी श्रीकांत पाटील ,वाय.पी तेज,भिमगड अरण्याचे सय्यद नदाफ, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनअधिकारी श्रीकांत पाटील यानी केले.