#आम.विठ्ठल हलगेकर,नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी बैलूरकर यांच्याहस्ते शुभारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात नगरपंचायतीच्या फंडातुन उभारण्यात आलेल्या उच्च क्षमतेच्या हायमास्क पथदिपांचे उदघाटन सोमवारी दि. ८ रोजी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर व खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ .मिनाक्षी बैलूरकर यांच्याहस्ते करण्यात आले.
खानापूर शहरातील शिवस्मारक चौक, जांबोटी क्राॅसवरील बसवेश्वर सर्कल,टिपू सुलतान चौक पारिश्वाड क्राॅस या महत्वांच्या चौकावर हायमास्क पथदिप उभारण्यात आले आहे.त्यामुळे खानापूर शहर प्रकाशाने झगझगाट होत आहे.
प्रांरभी नगरसेवक प्रकाश बैलूरकर यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ .जया भुतकी ,स्थायी कमिटी चेअरमन आप्पया कोडोळी चिफ आँफिसर संतोष कुरबेट,नगरसेवक मझहर खानापूरी विनोद पाटील,रफिक वारेमनी, नारायण ओगले,तोहिद चांदखन्नावर तसेच नगरसेविका मेघा कुंदरगी,लता पाटील,लक्ष्मी पाटील,रवी काडगी,भाजपचे सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, आमृत पाटील त्याच बरोबर नगरपंचायतीचे इंजिनिअर तिरूपती राठोड,गंगाधर कांबळे , प्रेमानंद नाईक,राजू जांबोटी,मोहसीन बडेघर ,कर्मचार तसेच शहरातील नागरीक आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.