#गर्लगुंजी गावात शिक्षकांची संख्या अधिक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) गाव शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर आहे.त्यामुळे गावात प्राथमिक ,माध्यमिक शाळा शिक्षकांची संख्या अधिक आहे. दर वर्षीच गर्लगुंजी गावाच्या शिक्षकाना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करतात.
त्याच प्रमाणे यंदाही सन २०२५ -२६ सालातील तालुका आदर्श पुरस्कार गर्लगुंजी गावच्या तीन शिक्षकाना प्राप्त झाला.
गर्लगुंजी गावचे शिक्षक पी.डी. कुंभार याना यंदाचा तालुका आदर्श पुरस्कार देण्यात आला आहे.
त्याच्या शिक्षकी पेशेला प्रारंभ दि.११ आँगष्ट १९९४ साली सरकारीi पूर्व प्राथमिक मराठी शाळा हब्बणहट्टी (ता.खानापूर ) या शाळेतुन झाली. याशाळेत दि .२ जुलै २००३ पर्यत ९ वर्षे सेवा केली. तेथून त्यांची बदली सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा झाडनावगे याशाळेत जुलै २००३ साली झाली. याशाळेत त्यानी गेली २२ वर्षे सेवा करत आहे.आज पर्यत त्यानी ३१ वर्षे शिक्षकी सेवा बजावली. त्याच्या दीर्घकाळ शिक्षकी सेवा व त्यानी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्याना यंदाचा तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.
हब्बनहट्टी सारख्या जंगल भागात त्यानी ९ वर्षे प्रामाणिकपणाने सेवा बजावली आहे.
त्याच बरोबर गर्लगु़जी गावचे दुसरे शिक्षक एस.टी.मेलगे यानाही यंदाचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या शिक्षकी सेवेचा प्रारंभ खानापूर तालुक्यातील अति जंगलाने व्यापलेेल्या पास्टोली (ता.खानापूर ) येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेत दि.१८आँगष्ट १९९४ साली झाला .याशाळेत त्यानी ४ वर्षे सवा बजावली. तेथून त्याची बदली गणेबैल येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत दि.२८ मार्च १९९८ साली झाली.याशाळेत त्यानी ११ वर्षे सेवा बजावली. तेथून त्यांची बदली सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळा ओतोळी याशाळेत दि.१९ जून २००९ साली झाली .याशाळेत सात वर्षे सेवा बजावली.तेथून त्यांची बदली सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा ओलमणी येथे दि.१८ दि. २०१६ साली झाली.त्या शाळेत गेली ९ वर्षे सेवा बजावत आहे.त्यानी गेले ,३१ वर्षात केलेल्या शिक्षकी सेवेच्या कार्याबद्दल यंदाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.
त्याचबरोबर गर्लगुंजी गावच्या शिक्षिका सौ.किरण धामणेकर (भांतकांडे) याना ही यंदाचा आदर्श शिक्षिका पूरस्कार देण्यात आला.
त्यानी आपल्या शिक्षकी सेवेची सुरूवात निडगल (ता.खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत केली .
त्यानंतर खानापूर तालुक्यातील हडलगा,मोदेकोप याशाळेत सेवा बजावली.तेथून त्यांची बदली देसुर(ता.बेळगांव ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत झाली. तेथून त्याची बदली गर्लगुंजी (ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी झाली.सध्या याच शाळेत त्या कार्यरत आहेत.त्याना ही यंदाचा तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.
गर्लगुंजी गावच्या तीन शिक्षकाना यंदाचा तालुका स्तरीयआदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे गर्लगुंजी गावासह खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.