#ग्राम पंचायत सदस्य व पीडीओ यानी केली पाहणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील दहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मुर्तीच्या विसर्जणाच्या तयारीसाठीची पाहणी गावच्या पूर्वेला असलेल्या मसोठी तलावात ग्राम पंचायती्च्यावतीने करण्यात आली.
यावेळी ग्राम पंचायतीचे पी डी ओ जी.एम खामकर तसेच ग्राम पंचायत सदस्य हणमंत मेलगे,परशराम चौगुले व अजित पाटील आदी उपस्थित होते.
तलावाच्या परिसरात सापसफाई करून याठिकाणी सार्वजनिक गणेश मुर्तीच्या विसर्जणासाठी सोय करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी विधुत लाईटची सोय,तसेच इतर सोय ही करण्यात आहे.
तलावाच्या परिसरात चिकन सेंटर कडुन टाकण्यात येणार्या कचर्यावर कारवाई!
गर्लगुंजी गावच्या पूर्वेला असलेल्या तलावाच्या परिसरात कोंबड्याची पिस, टाकाऊ माल टाकून तलावाच्या परिसरात ,रस्त्यावर घाण पसरली जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरते.यावर ग्राम पंचायतीकडुन संबंधीतावर कारवाई केली जाईल.असा ईशारा ग्राम पंचायतीच्यावतीने देण्यात आला आहे.
