#पंचहमी गॅरेटी योजना कमिटीच्या बैठकीच्या माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका गॅरेंटी योजना कमिटी मासिक बैठक खानापूर तालुका पंचायत सभागृहात मंगळवारी दि.२ रोजी आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थान गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग करण्यात आले. या मीटिंगमध्ये पाच गॅरंटीचे अधिकारी उपस्थित होते.या पाच गॅरंटी मध्ये प्रमुख गॅरेंटी योजना गृहलक्ष्मी या खानापूर तालुक्यामध्ये ६४१२५ जन गृहलक्ष्मी लाभार्थी आहेत, या लाभार्थीने प्रत्येकी २००० प्रमाणे महिन्याला, खानापूर तालुक्यात बारा कोटी ८२ लाख रुपये बँकेत जमा होत आहेत, अशी माहिती या विभागाचे अधिकारी सीडीपीओ बजेन्त्री यांनी दिली. हेस्कॉम अधिकारी मोहिते यांनी दिलेल्या माहिती नुसार गृह ज्योती लाभार्थी ६१५५६ जन असून ऑगस्ट महिन्यातील लाईट बिल एक कोटी नव्यानो लाख,बारा हजार रूपये इतकी रक्कम विज बिल माफ मिळाले आहे. व खानापूर तालुक्यात जी विजेची समस्या जांबोटी भागात होत आहे त्याबद्दल त्यांनी सांगितले ती लाईन बेळगाव वरून जांबोटी भागात येत असल्याकारणाने फक्त जांबोटी भागात लाईटीची अडचण येत आहे त्याबद्दल आपल्या विभागामार्फत सोनारवाडी या गावांमध्ये भाडे तत्त्वावर जागा घेतली आहे त्या गावांमध्ये पॉईंट पावसाळ्यानंतर करण्यात येईल व जांबोटी भागातील कायमची लाईटची दुरवस्था होत आहे ती होणार नाही याची येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये काम पूर्ण करून दक्षता घेण्यात येईल. जे महिलांसाठी शक्ती योजना आहे, खानापूर डेपोतून बस प्रवास फ्री या योजनेअंतर्गत गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये रोजच्या सरासरी प्रमाणे
638497 एवढी रक्कम झाली आहे. टोटल महिन्याचे शक्ति योजनेची रक्कम 19793413 बस फ्री झाले आहे. खानापूर तालुका रेशन विभाग यावेळी माहिती देताना फूड इन्स्पेक्टर श्री खातेदार यांनी सांगितले खानापूर तालुक्यातील सर्व दुकानदार रेशन पुरवठा सुरळीत करत आहेत, गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये तांदूळ व जोंधळे देण्यात आले होते पण या सप्टेंबर महिन्यांमध्ये सर्व रेशन लाभार्थींना तांदूळ देण्यात येणार आहेत. युवा निधी या योजनेअंतर्गत 8037 खानापूर तालुक्यातलाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले की या महिन्यांमध्ये सरकारच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत वाईज शिबिर घ्यावयाचे आहे त्यामध्ये पहिल्यांदा ६ जि.प मध्ये या महिन्यामध्ये , गर्लगुंजी, पारिसवाड, नंदगड, गुंजी, बिडी, जांबोटी, ग्रामपंचायती पासुन सुरुवात करण्यात येणार आहे, या शिबिराला पाच गॅरंटीचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत, कोणाच्याही काही गॅरंटी योजनेच्याअडचणी असतील तर त्या शिबिरामध्ये शिबिरामध्ये सोडवण्यात येतील असे अध्यक्षपदावरून बोलताना सांगण्यात आले. या मिटींगला गॅरेंटी योजनेचे सदस्य ,प्रकाश मादार,
ईसाखान पठान
रुद्राप्पा पाटील. बाबू हत्तरवाड. संजय गावडे, प्रियांका गावकर, गोविंद पाटील, विवेक तडकोड, दीपा पाटील, शांताराम गुरव, जगदीश पाटील, युशुफ हरगी,व तालुका पंचायत अधिकारी रमेश मेत्री.
. विजय कोतीन(A,d,p,r,)
. श्रीकांत सपटला. मॅनेंजर हे मान्यवर उपस्थित होते.