संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील मारूती गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने श्री सत्य नारायण महा पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन गर्लगुंजी गावचे सुपूत्र व इदलहोंड प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक महेश कुंभार यांची खानापूर तालुका शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मारुती गल्ली गर्लगूंजी यांच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य व नागरीक उपस्थित होते.
मुख्याध्यापक महेश कुंभार हे शिक्षकी सेवे बरोबर संगीत ,कला,गणेश मुर्तीकार म्हणून त्यानी ठसा उमटविलेला आहे.
त्यांच्या कार्याबद्दल खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
