#भक्ती भावाने गणेशाचे उत्साहात स्वागत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) परिसरात बुधवारी दि.२७ रोजी घरगुती गणेशाचे उत्साहात स्वागत झाले.
बुधवारी सकाळ पासुन घरोघरी दारात रंगीबेरंगी रांगोळ्यांनी अंगण सुशोभित केले होते.घरोघरी विधुत रोषणाई ,मंडप सजावट करून गणेश बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती.
गर्लगुंजी गावात गल्लोगली अनेक गणेश मुर्तीकार असल्याने गणेश भक्तानी गणेश मुर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती.
घरगुती गणेश मुर्ती नेण्यासाठी चार चाकी वाहनातुन तर कोणी डोकीवरून गणेशमुर्ती घेऊन जात होते. फट्याकड्याची आताषबाजी करत युवक गणेशाच्या आगमणाचे स्वागत करत होते.
गणपती बाप्पा मोरया! मंगल मुर्ती मोरया! व ढोल ताशाच्या निनादात मंगलमुर्तीचे घरोघरी स्वागत होते.
गणेशाच्या आगमणाने गर्लगुंजी परिसरात आनंदाला उधान आले होते. अबालपासुन वृध्दापर्यत सर्वजन गणेशाच्या स्वागतासाठी तल्लीन झाले होते.
सुवासिनीकडुन आरती ओवाळुन गणेशाचे स्वागत होते.