#सचिव डाॅ.नाडगौडा याचे पालकाना मार्गदर्शन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये यंदाच्या २०२५ -२६ शैक्षणिक सालातील पहिला पालक मेळावा मंगळवारी दि.२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव डाॅ.डी.ई.नाडगौडा उपस्थित होते.
व्यासपिठावर व्यवस्थापिका सौ.दिव्या नाडगौडा, मुख्याध्यापक बाळकृष्ण हलगेकर होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व फोटो पुजनाने झाली. प्रास्ताविक व्यवस्थापिका सौ.दिव्या नाडगौडा यानी केले. तर स्वागत मुख्याध्यापक बाळकृष्ण हलगेकर यानी केले.
यावेळी बोलताना सचिव डाॅ.डी.ई.नाडगौडा म्हणाले आजच्या पालक मेळाव्याला पालकाची उपस्थिती मोठ्या संख्येने राहिल्याने मला खूप आनंद झाला. मात्र विद्यार्थ्याच्या परिक्षा निकालाबद्दल पालक संतुष्ट होते.बरेच पालक आज मुक्तव्यासपिठ मिळाल्याबद्दल शाळेच्या प्रगती बद्दल व वाटचाली बद्दल बोलताना आनंदी होते. पुढे बोलताना ते म्हणाले की पालकांनी आपल्या पाल्यांना कसे आनंदी ठेवता येईल याकडे आधिक लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले.
यावेळी पालक यानात्याने बोलताना लबीब महमद कबीर शेख म्हणाले की, शाळेची प्रगती समाधान कारक आहे. अशी प्रशंसा केली .तर थोड्या विद्यार्थ्याच्या संदर्भात काही केल्या.विद्यार्थ्याच्या सर्वांगीन विकासासाठी पालक या नात्याने पाल्याच्याकडे लक्ष पूरविने गरजेचे आहे. तसेच पाल्यांना वेळेचे बंधन केल्याने आपली मुले शिस्तबध्द झाल्याचे सांगीतले.
मुख्याध्यापक बाळकृष्ण हलगेकर यानी पालकाशी जातीनिशी चौकशी करून शाळेच्या प्रगतीबद्दल मार्गदर्शन केले.
आभार व्यवस्थापिक सौ.दिव्या नाडगौडा यानी मानले.