संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराचा जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणाची निधी अभावी दुर्दशा झाली आहे. तालुक्यातील खेळाडुना सरावासाठी क्रिडांगणाचा वणवा आहे.
तालुक्यात एकमेव क्रिडांगण म्हणून मलप्रभा क्रिडांगणाकडे पाहिले जाते.मात्र आज खानापूरच्या मलप्रभा क्रिडांगणाच्या सोयी अभावी दुर्दशा झाली आहे.
या क्रिडांगणाला संरक्षण भिंत नाही आहे.खेळांडू साठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही.सौचालयाची सोय नाही , विजेची सोय नाही.ऐवढेच नव्ह तर क्रिडांगणावर कोणत्याच खेळाचा सोय नाही. यात धाव पट्ट्यांची सोय नाही.खो-खो,कबड्डी,व्हाॅली बाॅल खेळाचे ग्राऊंड आखलेले नाही.
यासाठी सरकारकडुन अद्याप निधीची तरदुत न केल्याने मलप्रभा क्रिडांगण म्हणजे जनावराना चारण्यासाठी गायरान झाले.या क्रिडांगणावर खेळांडुची संख्या कमी तर चरणार्या जनावरांची सख्या जास्त आहे. त्यामुळे मलप्रभा क्रिडांगणाचे महत्वच राहिले नाही.केवळ अनेक वर्षे निधीची तरदुत न केल्याने ही आवस्था झाली.
तालुक्यातील पीकेपीएस सोसायट्यांच्या गुडाऊणासाठी १० कोटीचा निधी?
केवळ डीसीसी बॅकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच कधी नव्हता तेवढा १० कोटीचा निधी खानापूर तालुक्यातील पीकेपीेएस सोसायट्यांच्या गुडाऊण साठी मंजुर झाला.प्रत्येक पीकेपीएस सोसायट्याना २५ लाख रूपयांचा निधी देण्यात येत आहे. मात्र तालुक्यात चांगला खेळांडू निर्माण व्हावे.यासाठी मलप्रभा क्रिडांगणाला केवळ दोन कोटी रूपयाच्या निधीची तरदुत झाली नाही. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी चांगले क्रिडांगण नसल्याने चांगले खेळांडु निर्माण होत नाही. जो पर्यत मलप्रभा क्रिडांगणावर सर्व सोयी होत नाहीत. तो पर्यत चांगले खेळांडु होणे कठीण आहे.
यासाठी चांगल्या दर्जाचे खेळांडु होण्यासाठी क्रिडांगणाला निधी मंजुर करणे तालुका प्रतिनिधीचे पहिले काम आहे. गेली कित्येक वर्षे क्रिडांगणाकडे लक्ष दिले गेले नसल्याने मलप्रभा क्रिडांगणाची वाट लागली आहे.
खरोखर गरजेच्या ठिकाणी निधी वापरून तालुक्याचा साधावा. अशी मागणी तालुक्याच्या जनतेतुन होत आहे.