संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मुळच्या दोड्डहोसुर (ता.खानापूर) गावच्या सध्या राहणार विद्यानगरच्या रहिवाशी व खानापूर चिरमुरकर गल्ली मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता तुकाराम सायनेकर ( वय.५५) यांचे सोमवारी दि.२५ रोजी रात्री ९ वाजता केएलई बेळगाव येथील रूग्णालयात उपचार दरम्यान आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक विवाहित मुलगी ,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्यविधी उद्या मंगळवारी दि.२६ रोजी सकाळी ११.३० वाजता खानापूर मुक्तीधाम स्मशानभूमीत होणार आहे.
माजी सैनिक गणपत गावडू पाटील (विद्यानगर) यांच्या त्या पत्नी होत.