#खानापूर काॅग्रेस पक्षाकडून निषेद!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचा विकास होणे गरजेचे आहे.पण याकडे अधिकार्यासह लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत असल्याने नुकताच खानापूर काॅग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यानी रस्त्यातील खड्डयात झाडे लावून नाराजी व्यक्त करत निषेध ही व्यक्त केला.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी म्हणाले की, आपल्या हिंदू धर्मात गणेश उत्सव हा आनंदाने साजरा होतो.११ दिवस अनंत चतुर्थी पर्यत तालुक्यातील अनेकजन पर राज्यातुन आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येतात.
मात्र खानापूर तालुक्यातील एकही रस्ता खड्ड्याशिवाय दिसत नाही.बाहेरून आलेल्या चाकर मन्याना या खड्ड्यांचा त्रास करताना असे वाटते की खानापूर तालुका कधी सुधारणारच नाही.असाच मागासलेला राहणार आहे काय.? लोकप्रतिनिधी निवडूण येतात .मात्र विकास करण्याची मानसीकता दिसुन येत नाही.त्यामुळे वर्षानुवर्षे तालुक्यातील रस्ते खड्ड्यानी भरलेले आहेत.
याची प्रचिती सर्वानच दिसुन येत.गेंड्याचा कातडीचे तालुका अधिकारी असलेल्या तालुक्यात विकासच नाही.यासाठी आम्ही काॅग्रेस पक्षाच्या वतीने पायी चालत जाऊन खड्ड्यात झाडे लावुन निषेद व्यक्त केला.
यापुढे तरी रस्त्यातील खड्डंयाची समस्या दुर होईल ही अशा बाळगुन हा निषेद केल्याचे अँड ईश्वर घाडी यांचे म्हणने आहे.
जर असेच रस्त्यावर खड्डे पडुन राहिले तर वाहने चालवताना दुचाकी धारकाना जीव गमवावा लागणार.
तेव्हा सनाच्या काळात रस्त्यातील खड्डे बुजवावे अशी मागणी खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाचा नेत्यानी तसेच कार्यकर्त्यानी केली आहे.