#तालुक्यातील शेतकर्याना बद्ल पाहिजे!
#तालुक्यातील शेतकरीच देणार नवीन चेहर्याला संधी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या वीस वर्षापासुन तालुक्यातील जनतेने खानापूर डी सी सी बॅकेच्या निवडणूकीत इतका रस घेतला नाही. तेवढा रस येत्या आँक्टोबर महिण्यात होणार्या खानापूर डी सी सी बॅकेच्या निवडणुकीत आता पासुनच घेतला आहे.
त्यामुळे तालुक्यातुन डीसीसी बॅकेच्या निवडणुकीचे आतापासुनच पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे.
सध्या गर्लगुंजी पीकेपीएस सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यामान संचालक राजू सिध्दाणी यानी पत्रकार परीषद घेऊन कोणत्याही परिस्थित डीसीसी बॅकेची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.त्याना खानापूर तालुका भाजपचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा संपूर्ण पाठींबा मिळण्याची तयारी दर्शविली.
तर खानापूर तालुक्यात प्रथमच डीसीसी बॅकेच्या निवडूणीकाच्या माध्यमातुन पुढे येत असलेले राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधु व एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यानी ही विजयाचा चंग बाधुनच डीसीसी बँकेच्या निवडणुकीत उतरणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील काॅग्रेस पक्षाचे नेते ,कार्यकर्ते तालुक्यात गावोगावी फिरून पीकेपीएस संचालकाच्या भेटीगाठी घेत आहेत. तालुक्यातुन त्यांच्या पाठीशी अनेक नेेते मंडळी उभी राहणार आहेत.त्यामुळे एमएलसी चंन्नराज हाट्टीहोळी याना विजयासाठी मोठी संधी मिळणार आहे.
तर गेली कित्येक वर्षे खानापूर डीसीसी बॅकेवर संचालक म्हणून असलेले माजी आमदार अरविंद पाटील ही यंदाची डीसीसी बॅकेची निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. यांच्याकडुन तालुक्याच्या शेतकर्यांच्या अनेक अपेक्षा होत्या.परंतु शेतकर्यांच्या अपेक्षा पुर्ण होत नसल्याने शेतकर्यातुन तसेच संचालकातुन नाराजी दिसुन येत आहे.
यामुळे यंदाच्या आँक्टोंबर मध्ये होणार्या खानापूर डीसीसी बॅकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आता पासुनच दिसत आहेत .
खानापूरात डीसीसी बॅकेची निवडणुक ही पक्ष विरहित असुन वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकत्र येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणुक आगदी चुरशीची होणार.
खानापूर तालुक्यातील शेतकर्याचे कल्याण करण्यासाठी ही निवडणुक लढविली जाणार आहे. गेली अनेक वर्षे तालुक्यातील शेतकर्याना आनेक त्रासाचा अनुभव आला आहे. हा त्रास संपला पाहिजे. डीसीसी बॅकेत तालुक्यातील एका ही युवकाला रोजगाराची संधी मिळाली नाही.यापुढे तरी युवकाना रोजगारची संधी मिळावी. शेतकर्यावरील अन्याय थांबवावा.
यासाठी खानापूर डीसीसी बॅकेची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे.
मागील वेळी माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकर यानी कडवी झुंज देऊण केवळ एक मताने पराभव पत्करावा लागला.याचा अंदाज बांधता सर्व पक्ष एकत्र येऊन खानापूर डीसीसी बॅक निवडणुक लढविली तर नक्कीच नव्या चेहर्याला संधी मिळण्यास काही कठीण नाही.
खानापूर डी सी सी बॅकेच्या या निवडणूकीला आजुन चार महिण्याचा कालावधी आहे. तेव्हा काय घडामोडी होतील याचा अंदाज बाधणे कठीण आहे.