#शुक्रवारी खानापूरच्या जुन्या बस स्थानकातून बससेवेला सुरू
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जुन्या बस स्थानका पर्यतच्या बसफेर्या गेल्या दोन वर्षापासुन बंद करण्यात आल्याने, गेल्या दोनवर्षा
पासुन अपंग व्यक्तीना, महिलाना, वृध्दाना तसेच बालकाना जांबोटी क्राॅसपासुन शिव स्मारकातील जुन्या बस स्थानका
पर्यत पायी चालक येजा करावी लागत आहे.
ही समस्या सोडण्यासाठी गेल्या वर्षभरापासुन प्रयत्न सुरू आहेत.याबाबत तालुक्याच्या आमदारांच्या सुचनेला ही खानापूर डेपो अधिकार्यानी डुंकून ही दाद दिली नाही.विविध संघसंघटनेच्या प्रतिनिधीनी ,व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदन, मोर्चा आवाज उठवुन ही दाद दिली नाही.
जुन्या बस स्थानकापर्यत बसेस येत नसल्याने प्रवाशांना पाय पीट करण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुऴे याचा विद्यार्थी , नोकर वर्ग तसेच प्रवाशी
वर्गाला एक ते दोन किलोमीटर चालत जाणे कठीण होत आहे.
रिक्षाभाडे गरीब कुटूंबाना परवडत नसल्याने पायी चालत जाणे मुष्कील होत आहे.
मात्र शुक्रवारी दि.३० आँक्टोबर रोजी खानापूर तालुका पंचगॅरेटी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी यानी बससेवा तातडीने सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर खानापूर के एस आर टी सी आगार प्रमुखांनी लागलीच बसफेर्या सुरू करण्याचा निर्णय घेतला.
बसआगार प्रमुखानी पंचहमी योजना अध्यक्षाचा शब्द पाळला!
खानापूर जुन्या बस स्थानकापर्यत बस सेवा सुरू व्हावी ,यासाठी गेल्या दोन वर्षापासुन आमदारानी प्रयत्न केले,विविध संघटनानी निवेदन दिली होती.नागरीकाकडुन मागणी होत होती.परंतु अद्याप निर्णयच झाला नाही.
मात्र खानापूर तालुका पंचगॅरेटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यानी आंदोलनाचा ईशारा देताच शुक्रवारी बस आगार प्रमुख संतोष यानी स्वत: बस वाहन चालवुन बससेवा सुरू केली.व शब्द पाळला.
यावेळी खानापूर तालुका पंच गॅरंटी योजना अद्यक्ष व काॅग्रेस नेते सुर्यकांत कुलकर्णी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.