#जिल्हाधिकारी,तहसीलदार, ता,प,अधिकारी,खासदार,आमदाराना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गोल्याळी ग्राम पंचायत हद्दीतील तळावडे, गवळीवाडा गावच्या वस्तीत अद्याप वीजपुरवठाच झालाच नाही.
भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत वीजपुरवठ्याची सुविधा नाही. तेव्हापासून आजपर्यंत खानापूर तालुक्यात किती आमदार झाले.किती जिल्हा पंचायत सदस्य झाले किती तालुका पंचायत सदस्य झाले आणि किती त्या भागातील ग्रामपंचायत सदस्य झाले व नेतेगिरी गाजविणारे नेते झाले परंतु सदरी गावाकडे कुणाचेही लक्ष नाही.तळावडे, गवळीवाडा येथील लोकसंख्या शंभर ते दीडशे च्या आसपास असून ४०ते ५०घरे आहेत एवढी लोकसंख्या असून सुद्धा त्या गावाला आज पर्यंत विद्युत सुविधा नाही सदरी गावच्या नेतेमंडळींनी त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील चिखले यांना घेऊन खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे माजी युनियन अध्यक्ष व भू लवाद न्याय मंडळाचे सदस्य विनायक मुतगेकरr. भूल लवाद न्याय मंडळाचे सदस्य यांच्यामार्फत सोमवारी दि,२ रोजी खानापूर हेस्काॅम व तालुका पंचायत ऑफिसर तसेच तहसीलदार व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओ डीएफओ. तालुक्याचे आमदार हलगेकर सर. तसेच पीएमओ ऑफिस न्यू दिल्ली व खासदार यांच्याकडे निवेदनाद्वारे लिखित तक्रार करून लवकरात लवकर सदरी गावाला विद्युत पुरवठा करून त्या गावच्या नागरिकांना खरे स्वातंत्र्य मिळवून द्यावे .आशा मागणीचे निवेदन देण्यात आले , व बेळगाव जिल्हाधिकारी यांना व जिल्हा पंचायत सीईओ तसेच इलेक्शन कमिशनर बेंगलोर यांना निवेदन देऊन आम्ही गावकरी जर आम्हाला जिल्हा पंचायत व तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत या निवडणुकीच्या अगोदर वीजपुरवठा केला नाही.तर आम्ही सर्व गावकरी या सर्व निवडणुकावरती व आमदार निवडणुकीवर कायमचा बहिष्कार घालणार असे निवेदनात म्हटले आहे. वरील लोकप्रतिनिधी व अधिकारी
तालुक्यातील सर्व राजकीय नेतेमंडळींनी व समाजसेवकांनी आपल्याला गावाला विज पुरवठा करून सहकार्य करावे. अशी गावकऱ्यांनी तालुक्यातील नेतेमंडळी कडे हाक मारलेली आहे. तेव्हा या हाकेला कोण ओ देतोय तेच पाहावं लागेल.