संदे क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूलमध्ये सुरक्षित बचपन अभियान कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला.यावेळी खानापूर न्यायालयाचे न्यायाधीश दानप्पा व कानुन सेवा समिती एकचे न्यायाधीश नयना अळवंडे आदी उपस्थित होते.तर कार्यक्रमाला प्रभारी बी ई ओ मंजुनाथ हत्ती, वकील संघटनेचेअध्यक्ष ईश्वर घाडी,
सेक्रेटरी वाय एम कदम, रिसोर्स पर्सन अँड.व्ही. के. गुड्डी, मुख्याध्यापक के.व्ही,. कुलकर्णी,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्यायाधीश दानाप म्हणाले की, विद्यार्थीनीची छेड काढणे, वाईट शब्द वापरणे, हेच सर्व गुन्हे असुन अशा कृती मध्ये विद्यार्थवर्गानी त्यामध्ये गुंतवून नये. आभ्यासाकडे लक्ष देऊन चांगले मार्कस घेऊन पास होण्यासाठी प्रयत्न करावे.
न्यायाधीश नयना अळवंंडे म्हणाल्या की विद्यार्थीनीनी अभ्यासाव्यतिरीक्त कोणत्याही प्रकारच्या कामात स्वताला गुंतवून न ठेवता भविष्याबद्दल विचार करून ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्न करावे.
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले की,विद्यार्थ्याना त्यांच्यावर होणार्याअन्यायासाठी असलेल्या बऱ्याच गोष्टीचा उलघडा करत विद्यार्थीनीनी स्वताला अभ्यासात गुंतवून चांगला अभ्यास व चांगले ज्ञान मिळवुन स्वतःचे भविष्य उज्वल करावे .
मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी म्हणाले की कायद्याची जाणीव व त्याचा जीवनात उपयोग करूनघेण्यासाठी प्रयत्न करावे , असे आवाहन केले
यावेळी प्रभारी बीईओ मंजुनाथ हत्ती, शिक्षक वर्ग उपस्थित होते.
शेवटी न्यायाधीश दानाप्पा यानी विद्यार्थ्याना प्रतिज्ञाविधीचे बोधन केले.