८ दिवसात तालुका ब्लाॅक. काॅग्रेस अध्यक्षांच्याकडे अर्ज दाखल करा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
राज्यात तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण जाहिर होताच, खानापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात हालचालीना जोर आला.त्यामुळेच खानापूर तालुका ब्लाॅक काँग्रेसच्यावतीने तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडुन खानापूर तालुका ब्लाँक काँग्रेस अध्यक्षाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी माजी आमदार व एआयसीसी सचिव डाॅ अंजली निंबाळकर यांच्या सुचनेनुसार येत्या आठ दिवसात अर्ज करण्याची सुचना केली आहे.
तेव्हा इच्छुक उमेदवारानी आपले नाव , पत्ता, व मोबाईल नंबर तसेच तालुका पंचायत व जिल्हा पंचायत विभागाचे नाव द्यावे.
त्याच बरोबर उमेदवाराने आपला परिचय लिहुन येत्या आठ दि वसा च्या आत अध्यक्षाच्याकडे अर्ज करावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
खानापूर तालुका ब्लाँक काॅग्रेस तालुक्यातील गर्लगुंजी,जांबोटी,नंदगड ,लोंढा, पारिश्वाड, व कक्केरी या सहा जिल्हा पंचायत मतदार संघात तसेच वीस तालुका पंचायत मंतदार संघात सत्ता मिळविण्यासाठी य़ेत्या आठ दिवसातच इच्छुकाकडुन अर्ज मागविण्याची तयारी दर्शविली आहे.त्यामुळे इतर पक्षा पेक्षा व संघटनेपेक्षा जास्त ताकद लावुन तालुक्यात सुध्दा काॅग्रेसचे सरकार आणण्याचा काटोकाट प्रयत्न करण्याचा प्रयत्न होणार अशी चिन्हे दिसत आहे.याकडे तालुक्यातील जनता कुणाला तारणार व कुणाला मारणार हे येणार काळच सांगेल.