#खानापूरात भाजपचे आमदार, काॅग्रेसचे सरकार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अतिशय दुर्गम आणि जंगलाने व्यापलेला तालुका आहे. आशाने खानापूर तालुक्याला अनेक समस्यानी ग्रासलेले आहे.त्यामुळे तालुक्याचा विकास होत नाही.कि, खानापूर तालुक्याला भाजपचे आमदार तर सत्ताधारी सरकार काॅग्रेसचे आहे.म्हणून विकास होत नाही.असा समज असलेल्याने तालुक्यात विकासाची गंगा खुंंटली आहे.एवढेच नव्हे तर तालुक्याला बी ई.ओ अधिकारी ( गटशिक्षणाधिकारी), टी एच ओ अधिकारी,( आरोग्य अधिकारी),तसेच ई ओ अधिकारी ( तालुका पंचायत कार्य निर्वाह अधिकारी) मिळणे कठीण झाले आहे.
तालुक्याच्या शिक्षण क्षेत्राचे, तालुक्यातील रूग्णाचे, तसेच तालुक्यातील गावाच्या विकासाचे नुकसान होऊ नये. म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा संघटनेच्यावतीने खानापूर तालुक्याला अधिकारी मिळावे.तालुक्याचा विकास व्हावा.यासाठी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष,तसेच सीमाभागाचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके,मुख्य सल्लागार सचिन गोरल ,उपाध्यक्ष नारायण मुंचंडिकर , सुरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, जोतिबा यळुरकर ,विकास कलटगी आदी नेत्याना खानापूर तालुक्याला बी ई ओ, टी एच ओ, ई ओ आदी अधिकारी द्या.अशी मागणी करत बेळगाव जिल्हाधिकारी महम्मद रोशन याना निवेदन देऊन मागणी केली. तसेच राज्याच्या मुख्य सचिवाना ईमेलव्दारे मागणी केली.
खानापूर तालुक्यातील नेत्याना , लोकप्रतिनिधीना याची कधी जाग येणार तालुक्या बाहेरील नेत्याना खानापूर तालुक्याबद्दल तळमळ आहे.मात्र खानापूर तालुक्याचे नेते, लोकप्रतिनिधी गप्प का असा सवाल खानापूर तालु क्या च्या जनतेला पडला आहे.
कारण खानापूर तालु क्या ला भाजपचा आमदार, सरकार मात्र काॅग्रेसचे आहे.हे तर कारण नसेल काय?