सहकार न्यायालयाने पुननिर्युक्तीचे आदेश देऊन ही बॅकेची टाळाटाळ!
“प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमात दिले निवेदन”
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील पी एल डी बॅकेत गेली २४ वर्षे म्हणजेच दि.१७ मे २००० पासुन सुरेखा कुलम सेवा बजावत होत्या.मात्र कोणती सुचना न देता दि.१९ जुलै २०२४ से वेतुन कमी करण्यात आले. या निर्णयाविरोधात त्यानी कर्नाटक सहकार संस्था कायदा १९५९ मधील कलम ७० अंतर्गत सहकार न्यायालयात दाद मागीतली.मात्र सहकार न्यायालयाने सेवेत पुनर्नियुक्तीचे आदेश दिल्यानंतर ही आदेशाची अमंलबजावणी होत नसल्याने सुरेखा कुलम यानी सोमवारी दि.५ आँक्टोबर रोजी खानापूर लोकभवना आयोजित प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमात पालक मंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आदेश असुन ही सेवेत घेतले जात नाही.असा गंभीर आरोप केला आहे.कारण माझे कुंटूंब हे माझ्या नो करी वर अवलंबुन आहे. न्यायालयाने माझ्या बाजुने निर्णय देऊन ही मला सेवेत घेतले जात नाही.,तेव्हा पालक मंत्री सतीश जारकिहोळी यानी माझ्या तक्रारीची दखल घेऊन मला सेवेत पुनर्नियुक्त करावे व मला न्याय द्यावा.अशी मागणी केली आहे.
आता पी एल डी बॅके कोणती भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागुन आहे.