संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप (ता.खानापूर ) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यासाठी ट्रक्स सुटची सोय व्हावी.या उद्देशाने देणगी स्वरूपात अजय विष्णु सुतार,बलिराम दत्तात्रय कुंभार,कृष्णा मल्लापा कुंभार याच्याकडुन एकूण सहा हजार रूपयाची रक्कम देण्यात आली.त्यामुळे सिंगीनकोप मराठी शाळेच्या विद्यार्थ्याना लवकरच ट्रॅक्स सुट सोय होणार आहे.
सिंगीनकोप मराठी शाळेच्या विद्यार्थ्याना शाळेची ओढ लागावी, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, यासाठी इदलहोंड ग्राम पंचायत माजी सदस्य व सिंगीनकोप गावचे शिक्षणप्रेमी,महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत नेते कृष्णा कुंभार याचे हे प्रयत्न सुरू आहेत.मराठी शाळेसाठी त्याचा नेहमीच पुढाकार आहे.
त्यामुळे सिंगीनकोप मराठी शाळेची प्रगती होत आहे.ते सदैव सिंगीनकोप मराठी शाळेच्या प्रगती साठी विविध योजना राबवत असतात.त्यामुळेच आज सिंगीनकोप मराठी शाळेत विद्यार्थ्याची संख्या वाढत आहे.