श्रीरवळनाथ शर्यत कमिटीच्या वतीने आयोजीत!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
दोड्डहोसुर (ता.खानापूर )येथील श्री रवळनाथ शर्यत कमिटीच्यावतीने बुधवारी दि.३० रोजी सकाळी १० वाजता
एका बैलगाड्याची चाके न बांधता बैलगाडा ओढण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक एन एम पाटील उपस्थित राहणार आहेत.तर उदघाटक म्हणून खानापूर तालुक्याचे आमदार तसेच योगेश ट्रेडर्सचे मालक प्रकाश पाटील आदीच्याहस्ते होणार आहे.
तर दीप प्रज्वलन व फोटो पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
बैलगाडा शर्यत दोन गटात होणार आहे!
बक्षिसे लहान गटासाठी अनुक्रमे ११ हजार १ रू, ९ हजार १रू,७हजार १रू,६हजार रू,५ हजार १ रू,४हजार १ रू,३हजार ५०१रू,३हजार १ रू,२हजार५०१ रू,२हजार १ रू,१७०१रू,१५०१रू,१२५१ रू,११५१रू, ११०१ व लकी ड्राॅ १५०१ रू अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
बक्षिसे मोठ्या गटासाठी अनुक्रमे ३१हजार रू,२५हजार रू,२१हजार १रू.१५हजार अशी एकूण १६ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तरी हौशी बैलजोडी मालकानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री रवळनाथ शर्यत कमिटी दौड्डहोसुर यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.