#गणेश मुर्तीचे स्वागत खड्डयातुन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका अति पावसाचा तालुका अशी ओळख आहे.यंदाच्या पावसाळ्यात खानापूर तालुक्याच्या खेडोपाडी रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
त्यामुळे गणेशोत्सव काळात गणेश भक्ताना खड्डेमय रस्त्याशी सामना करावा लागणार आहे.
इदलहोंड गर्लगुंजी रस्त्यावरील रेल्वे ब्रिज पासुन खड्ड्याचे साम्राज्य !
इदलहोंड गर्लगुंजी रस्त्यावरील रेल्वे ब्रिज पासुन गर्लगुंजी गावाच्या हद्दीपर्यत जागोजागी जीव घेणे खड्डे पडले आहेत.त्यामुळे यारस्त्यावरून ये जा करताना दुचाकी वाहन धारकाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
याऱस्त्यावरून वीटवाहतुक मोठ्या प्रमाणात केली जाते.या आवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर जागोजागी दोन फुट खोल खड्डे पडले आहेत.ते ही पाण्याने भरून घेले आहेत.
त्यामुळे पाण्याने भरलेल्या खड्डयातुन दुचाकी स्वाराना येजा करताना तारेवरची कसरत करावी लागते.
गणेशचतुर्थीचा सन, खड्डयातुन प्रवास!
आवघ्या काही दिवसात हिंदूचा मोठा सन
गणेश चतुर्थी उत्सव येत आहे.या गणेशचतुर्थीच्या सनासाठी अनेक नोकर वर्ग, पाहुणे मोठ्या उत्साहाने येतात.मात्र इदलहोंड गर्लगुंजी रस्त्यावरून येताना सर्वानाच तारेवरची कसरत करावी.लागणार आहे.
तेव्हा खानापूर तालुक्याच्या आमदारानी या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी.
अन्यथा गर्लगुंजी इदलहोंड परीसरातील नागरीकातुन कमालीची नाराजी पसरेल.अशी चर्चा यापरिसरातुन होत आहे.
नजिलकोडल, तसेच झुंजवाड ते वड्डेबैल रस्त्याची दुरावस्था
तालुक्यातील नजलीकोडल तसेच झुंजवाड ते वड्डेबैल रस्त्याची ही दुरावस्था झाली आहे.या गावच्या रस्त्यावर ही जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यातील खड्ड्यातुन वाहने चालविणे म्हणजे मृत्यूशी सामाना कराना लागतो.हे खड्डे कधी कुणाचा जीव घेतील सांगता येणार ऩाही.
# गर्बेनट्टी -खैरवाड व पडलवाडी
रास्ता खड्डेमय!
गर्बेनट्टी ते खैरवाड रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच म्हणावा लागेल, अशी परिस्थिति रस्त्याची झाली आहे.या रस्त्यावरून ये जा करताना वाहन धारकाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा.लागत आहे.
तसेच पडलवाडी रस्ता ही अतिशय खड्डेमय झाला आहे.
ऐन गणेशोत्सव काळात रस्त्याची दुरावस्था झाल्याने गणेश मुर्तीचे स्वागत निव्वळ खड्डयातुन होणार आहे.त्यामुळे गणेश भक्तातुन नाराजी पसरली आहे.
तेव्हा खानापूर च्या आमदारानी रस्त्याकडे लक्ष देऊन समस्या दुर करावी.अशी मागणी तालुक्याच्या जनतेतुन होत आहे.


