#दुचाकी ट्रकची समोरासमोर धडक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगांव पणजी महामार्गावरील खानापूर तालुक्यातील माणिकवाडी क्राॅसजवळ मंगळवारी दि.८रोजी रात्री ट्रक व दुचाकी यांची समोरासमोर जोराची धडक बसुन दुचाकी स्वार युवराज शत्रुघ्न माळिक वय ३२ रा जटगे (ता.खानापूर)हा जागीच ठार झाला.
तर पत्नी पत्नी मोहिनी युवराज माळिक वय २६ हि गंभीर जखमी झाली, लागलीच तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा ही मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, युवराज मळिक हा आपल्या पत्नी सोबत दुचाकीवरून खानापूरहुन आपल्या जटगे गावाकडे जात होते,
.यावेळी माणिकवाडी क्राॅसजवळ दुचाकी व ट्रक यांची समोरासमोर जोराची धडक झाली.त्यात युवराज हा जागीच ठार झाला.तर पत्नी मोहिनीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम केला.पोलिस पुढील तपास करत आहेत.
