#दि.२१ रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील खानापूर को-आँप बॅकेने यावर्षी ९९ लाख. २३ हजार ८२३ रूपयांचा निव्वळ ऩफा मिळविला.अशी माहिती चेअरमन अमृत शेलार यानी दिली.
यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता खानापूर जांबोटी रोडवरील शुभम गार्डन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
चेअरमन अमृत शेलार म्हणाले की, बॅकेचे एकूण सभासद १४,३७६ इतके आहेत.
बॅकेकडे ३कोटी,४४लाख,२१हजार२५० रूपये इतके भागभांडवल असुन ११ कोटी ९४ लाख १७ हजार रूपये इतका राखीव निधी आहे.बॅकेकडे ८८ कोटी ३ लाख १० हजार रूपयांच्या ठेवी असुन ६४ कोटी ३४ लाख ७३ हजार रूपयाची गुंतवणुक केली,असुन १११कोटी ९७ लाख ५ हजार इतके खेळते भांडवल असल्याचे सांगीतले.
खानापूर को-आँप बॅकेत आधुनिक बॅकेच्या सर्व सेवाउपलब्ध असुनपारदर्शक
व्यवहार व विश्वासार्हता ही बॅकेची खास ओळख आहे.असे सांगीतले, ज्या सभासदाची वयाची ७० वर्षे पूर्ण झाली आहेत व ४० वर्षाहुन अधिक काळ बॅकेचे सभासद आहेत.अशा सभासदाना वार्षिक एक हजार रूपये मानधन दिले जाते.
बॅकेत सेफ डिपाॅझिट लाॅकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
बॅकेच्या सभासदांच्या इयत्ता १० वी,१२ वी व पदवी परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त मुला मुलीचा गौरव केला जातो.
खानापूर को -आँप बॅकेच्या खानापूर येथील मुख्य शाखेसह नंदगड,बिडी,
पारिश्वाड, बेळगाव, काकतीवेस याठिकाणी शाखा असुन सर्व ठिकाणी सभासदाचा उत्तम प्रतिसाद लाभत असुन संचालक मंडळ व कर्मचार्याच्या परिश्रमामुळे बॅकेची दमदार वाटचाल सुरू आहे.