
#२० ते २२ जवान सरकारी दवाखाण्यात दाखल!
#उलटी जुलाब,थंडी तापाने त्रस्त परिस्थिती धोक्या बाहेर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील दुर्गानगर येथील पोलिस ट्रेनिंग सेंटरमधील २० ते २२ जनाना रविवारी रात्री पासुन उलटी जुलाब तर काहीना थंडीताप होऊन त्रस्त झालेल्या जवावाना सोमवारी दि.१६ रोजी खानापूर शहरातील सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले.लागलीच उपचार झाल्याने कोणताच धोका पोहचु शकला नाही. परिस्थित धोक्या बाहेर!
रविवारी सुट्टी असल्याने काहीनी बाहेर ठिकाणी जेवन केले तर काही जन पोलिस ट्रेनिंग सेंटर मध्ये जेवन केले.मात्र रविवारी रात्रीपासुन त्याना उलटी जुलाब तर काहीना थंडी ताप सुरू झाला.लागलीच पोलिस अधिकार्यानी सोमवारी सकाळी खानापूर सरकारी दवाखाण्यात दाखल केले.
यावेळी काहीनी रविवार असल्याने बाहेर जेवन केले तर काहीनी ट्रेनिंग सेंटर मध्ये जेवन केले. त्यामुळे नेमका कशामुळे त्रास झाला .याची चौकशी करण्यात येत आहे.
यावेळी सरकारी दवाखान्यातील डाॅक्टरनी योग्यतो उपचार दिल्याने परिस्थिती हाताळण्यात आली .सर्वांची प्रकृती ठिक असुन डाॅक्टर सर्वावर लक्ष ठेवून आहेत.
पोलिस ट्रेनिग सेंटर मध्ये वीष बाधा होण्याची ही पहिलीच घटना आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार सह काही नेत्या सरकारी दवाखाण्याला भेट देऊन चौकशी केली.