संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
वंध्यत्वाबाबत जनजागृती निर्माण करणे, आधुनिक वैद्यकीय उपचारांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि गरजू दांपत्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ओअँसिस IVF अँड फर्टिलिटी यांच्या वतीने “ओअँसिस जननी यात्रा” या मोबाईल फर्टिलिटी क्लिनिकचे आयोजन उद्या शुक्रवारी दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत खानापूर शिवस्मारक व कम्युनिटी हॉल येथे करण्यात आले आहे.
या जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी लेला शुगर्सचे एम डी .श्री पाटील, खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नाडगौडा, उपाध्यक्ष डॉ. मदन कुंभार, तसेच डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि खानापूर तालुक्यातील सर्व डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात ओअँसिस IVF अँड फर्टिलिटी सेंटरचे अनुभवी व निष्णात वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी, समुपदेशन आणि उपचारासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये मोफत तज्ज्ञ सल्ला, AMH तपासणी, वीर्य तपासणी (Semen Analysis), व्हायरल मार्कर्स तपासणी तसेच आधुनिक वंध्यत्व उपचारांबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच IVF उपचारांवर विशेष सवलतींचाही लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
खानापूर व परिसरातील ज्या दांपत्यांना वंध्यत्वाची समस्या आहे.अशा सर्वांनी या दुर्मीळ व सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा. आधुनिक वैद्यकीय विज्ञानामुळे वंध्यत्वावर प्रभावी उपचार उपलब्ध असून, योग्य वेळी तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास पालकत्वाचे स्वप्न साकार होऊ शकते.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.